IPL 2024 : आयपीएलमध्ये विराट कोहली रचणार इतिहास, इतक्या धावा करताच मानाच्या पंगतीत स्थान
रनमशिन्स विराट कोहली आयपीएल स्पर्धेसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सलग 17 वर्षे खेळणारा खेळाडू ठरणार आहे. आयपीएलमधील पहिलाच सामना 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या नावार इतिहास रचला जाईल.

आयपीएलचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यापासून स्पर्धेचा रंग चढत जाणार आहे. धोनी आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू आमनेसामने असतील.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा आणि शतक ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. तसेच एका सीझनमध्ये सर्वाधिक धावाही त्याच्या नावावर आहेत. 2016 मध्ये विराट कोहलीने 973 धावा केल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात रनमशिन्स विराट कोहलीला एक मैलाचा दगड गाठता येणार आहे. या सामन्यात विराट कोहलीने 6 धावा करताच एक विक्रम त्याच्या नावावर होणार आहे.

विराट कोहली टी20 क्रिकेटमध्ये 12 हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. फक्त 6 धावा करताच हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे.

विराट कोहलीने टी20 फॉर्मेटमध्ये 11994 धावा केल्या ठआहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4037 आणि आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या आहेत.

या पंगतीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टी20 फॉर्मेटमधये 11156 धावा केल्या आहेत. 9465 धावांसह शिखर धवन तिसऱ्या, 8654 धावांसह सुरेश रैना चौथ्या आणि 7066 धावांसह केएल राहुल पाचव्या स्थानी आहे.