Women’s T20 World Cup 2026:17 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, विजयासह या खेळाडूने केली अशी कामगिरी

WI W vs NZ W: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत वेस्ट इंडिजने गतविजेत्या न्यूझीलंड संघाला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात शिमेन कँपबेलने चमकदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे संघाला विजयाची चव चाखता आली. या सोबत तिची 17 वर्षांची प्रतीक्षाही संपली.

| Updated on: Jun 14, 2026 | 3:46 PM
1 / 5
क्रिकेट विश्वात विक्रम रचणं आणि मोडणं काही नवीन नाही.  पण काही खेळाडू या विक्रमांपासून वंचित असून प्रतीक्षा करत असतात. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावलेल्या खेळाडूने 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. (Photo: PTI)

2 / 5

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शिमेन कँपबेलने 62 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली. या अर्धशतकीय खेळीसह कँपबेलने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 वर्षे आणि 122 डावानंतर प्रतीक्षा संपवली आहे. (Photo: PTI)

3 / 5

शिमेन कँपबेलने 2009 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच अर्धशतक ठोकलं आहे. वुमन्स टी20 क्रिकेटध्ये कोणत्याही महिला खेळाडूसाठी अर्धशतकासाठीची दीर्घ प्रतीक्षा ठरली आहे. कँपबेलने 123व्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली. (Photo: PTI)

4 / 5

वुमन्स टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने पहिल्या अर्धशतकासाठी 100हून अधिक डाव खेळले आहेत. यापूर्वी हा विक्रम युगांडाच्या जॅनेट एम्बाजीच्या नावावर होता. तिने पहिल्या अर्धशतकासाठी 96 डाव खेळले होते. (Photo: PTI)

5 / 5

शिमेन कँपबेलने वेस्ट इंडिजसाठी 155 सामने खेळले आहेत. त्यात 123 डावात कँपबेलने 1621 धावा केल्या आहेत. तिचा बेस्ट स्कोअर हा नाबाद 90 धावा आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध तिने ही कामगिरी केली. (Photo: PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us