
वनडे वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड या संघाशी होणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला असणार आहे.

भारताचे 9 संघांसोबत टप्प्याटप्प्याने सामना होणार आहेत. त्यामुळे कोणताच संघ सुटणार नाही. टॉप 4 संघ उपांत्य फेरी गाठतील. त्यामुळे 7 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित असणार आहे. चला जाणून राउंड रॉबिन फेरीत टीम इंडियासमोर कोणत्या संघांचं आव्हान असणार ते..

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यातून टीम इंडियाचा वर्ल्डकपचा प्रवास सुरु होईल. ऑस्ट्रेलियाचा पेपर सर्वात कठीण असणार आहे. यात दुमत नाही. या सामन्यात जिंकणारा संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघी 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 8, तर भारताने 4 वेळा विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपमध्ये 8 सामने झाले आहेत. यात 4 सामन्यात भारताने, 4 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंड भारत यांच्यात कडवी झुंज असणार आहे.

2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला पराभवाची धूळ चारली होती. दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी 5 सामन्यात न्यूझीलंडने आणि 3 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्डकपमध्ये 5 सामने झाले आहेत. यात भारताने 2 तर दक्षिण आफ्रिकेने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे इथेही तोडीस तोड स्पर्धा पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 9 सामने झाले आहेत. यात 4 सामने भारतान, तर 4 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. तर एक सामना रद्द झाला आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात 4 वेळा लढत झाली आहे. यावेळी पारताने 3 सामन्यात विजय तर बांगलादेशने एकदा भारताला पराभूत केलं आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकच सामना झाला आहे. हा सामना भारताने जिंकला आहे.

भारत आणि नेदरलँड यांच्यात एकूण 2 सामने झाले आहेत. दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 7 सामने खेळले गेले आहेत. सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळीही भारताकडून अशाच अपेक्षा आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.