WI vs IND T20 Series | डन म्हणावं! वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी या तिघांची निवड!

बीसीसीआय निवड समिती वेस्टइंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयपीएल 16 व्या मोसमात धमाका केलेल्या त्रिमुर्तींचा समावेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 1:22 AM
1 / 4
टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआय 3 युवा खेळाडूंना टीम इंडियाकडून खेळण्याची संधी देऊ शकते. या तिघांची निवड नक्की समजली जात आहे. यामध्ये केकेआरचा रिंकू सिंह, पंजाब किंग्सचा जितेश शर्मा आणि राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल या तिघांचा समावेश असल्याचं निश्चित समजलं जात आहे.

2 / 4
रिंकू सिंह याने 16 व्या मोसमात केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांच्या मदतीने 474 धावा केल्या.  रिंकूने गुजरात विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला सनसनाटी विजय मिळवून दिला होता.

3 / 4
यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळताना  आयपीएल 16 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 625 धावा  ठोकल्या. या दोघांनी आपल्या संघांना अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले.

4 / 4
अमरावतीच्या जितेश शर्मा याने 14 व्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 309 धावा केल्या. यशस्वी, रिंकू आणि जितेश या तिघांनी आपली छाप सोडलीय. त्यामुळे आता या तिघांच्या नावाच्या औपचारिक घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय.