Smriti Mandhana सुस्साट, वर्षभरात रेकॉर्ड्सची रांग, इतके विक्रम मोडीत, एकदा पाहाच

Smriti Mandhana, Womens Team India : स्मृती मंधाना हीने 2025 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलंय. स्मृतीने आतापर्यंत 2025 वर्षात चाबूक कामगिरी केली आहे. स्मृतीने 2025 वर्षात नक्की काय केलंय? जाणून घ्या.

| Updated on: Oct 26, 2025 | 4:20 PM
1 / 5
वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली. भारताला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवण्यात भारताची ओपनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीने बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली. स्मृतीने 2025 वर्षात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
स्मृती 2025 या वर्षात सर्वाधिक आंतराराष्ट्रीय धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे. स्मृतीने 25 डावांमध्ये 1 हजार 480 धावा केल्या आहेत. तसेच यात 20 एकदिवसीय सामन्यांमधील 1 हजार 259 धावांचा समावेश आहे. (Photo Credit: PTI)

3 / 5
स्मृतीने 2025  वर्षात वूमन्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकंही झळकावली आहेत. स्मृतीने वनडे आणि टी 20i या 2 फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 6 शतकं केली आहेत. तसेच 2025 वर्षात स्मृतीच्याच नावावर सर्वाधिक 5 एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची नोंद आहे. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ताझमिन ब्रिट्स हीने स्मृतीच्या या विक्रमाची बरोबरी केली. (Photo Credit: PTI)

4 / 5
स्मृतीच्याच नावावर 2025 वर्षात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. स्मृतीने 12 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. स्मृतीने या दरम्यान 6 शतकं केली आहेत. तर 6 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo Credit: PTI)

5 / 5
दरम्यान स्मृती वूमन्स वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताच्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये अपयशी ठरली. मात्र त्यानंतर स्मृतीने जोरदार कमबॅक केलं. स्मृती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. स्मृतीने आतापर्यंत 6 डावांत 55 च्या सरासरीसह 100 च्या स्ट्राईक रेटने 331 धावा केल्या आहेत. स्मृतीने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo Credit: PTI)