
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या 22 व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर शानदार विजय नोंदवला. स्पर्धेत दुसऱ्यांदा मोठा उलटफेर अफगाणिस्तानने केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 50 षटकात 7 गडी गमावून 282 धावा केल्या आणि विजयासाठी 283 धावांचं आव्हान दिलं.

अफगाणिस्तानने हे आव्हान 2 गडी गमवून 49 व्या षटकात पूर्ण केलं. पाकिस्तानवर 8 गडी आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ ठरला आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत यापूर्वी हा विक्रम भारताच्या नावावर होता. 2003 मध्ये पाकिस्तानने भारतासमोर 274 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण आव्हान भारताने गाठत इतिहास रचला होता.

अफगाणिस्तानने आता भारताचा विक्रम मोडीत काढला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान समोर 283 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठल्याने अफगाणिस्तानच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

वनडे वर्ल्डकप इतिहासात पाकिस्ताने 275 हून अधिक धावा केल्या तेव्हा एकदाही पराभूत झाल नाही. मात्र यावेळी अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केलं.

अफगाणिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. अफगाणिस्तानने पाच पैकी 2 सामने जिंकले आहेत. पण उर्वरित 4 पैकी 4 सामने जिंकणं गरजेचं आहे.