
वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपद आहे. हार्दिक पंड्या याने टीम इंडियासाठी अनेकदा निर्णायक भूमिका बजावली आहे. हार्दिकने आयसीसी स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली आहे. हार्दिक यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गेमचेजिंग भूमिका बजावू शकतो.

हार्दिक सध्या तुफान फॉर्मात आहे. हार्दिकने आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली होती. हार्दिकने ईशानसोबत भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला होता.

हार्दिकमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे. हार्दिकने याआधीही अशी कामगिरी केली आहे. हार्दिकने अनेकदा अविस्मरणीय खेळी केली आहे. हार्दिकने 79 वनडे सामन्यांमध्ये 1 हजार 753 धावा केल्या आहेत. तसेच 74 विकेट्सही घेतल्या आहेत.

हार्दिकचा वनडेत 92 हा हायस्कोअर आहे. हार्दिकने 11 अर्धशतकंही ठोकली आहेत. तसेच हार्दिकने 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्सही घेतल्या आहेत.

वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.