
वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटील हीने चमकदार कामगिरी केली. आता श्रेयांकाला मोठी लॉटरी लागली आहे. श्रेयांकाची वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत निवड झाली आहे. श्रेयांका यासह या स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं आयोजन हे 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलंय. श्रेयांका या स्पर्धेत गयाना अमेजन वॉरियर्स टीमकडून खेळणार आहे. श्रेयांका परदेशी टी 20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळवणारी पहिलीच अनकॅप्ड भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलीय.

श्रेयांका विंडिज माजी कर्णधार स्टेफनी टेलर हीच्या नेतृत्वात खेळणार आहे. वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं यंदाचं दुसरं पर्व आहे. या स्पर्धेतील पहिल्या हंगामात फायनलसह एकूण 4 सामने खेळवण्यात आले होते. तर यंदा सामन्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

टीम इंडियाने वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कप जिंकला होता. या स्पर्धेतील कामगिरीसाठी श्रेयांकाला 'प्लेअर ऑफ द सीरिज' या पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.

श्रेयांका पाटील हीने या स्पर्धेत टीम इंडियाकडून 2 सामन्यात 7 ओव्हर बॉलिंग करुन फक्त रन्स देत 9 विकेट्स घेतल्या होत्या. श्रेयांका टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याला आपला आदर्श मानते.