WTC 2023 Final : ऑस्ट्रेलियाकडून चिडीचा डाव! मार्नस लॅबुशेनकडून बॉल टॅम्परिंग ?

| Updated on: Jun 10, 2023 | 9:13 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या भारतासमोर ठेवली आहे. 444 धावा गाठताना भारतीय फलंदाजांना दम निघणार यात शंका नाही. असं असताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने चिडीचा डाव खेळल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

1 / 9
इंग्लंडमधील ओव्हल येथे सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बॉल टॅम्परिंग केल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

2 / 9
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठी धावसंख्या उभारली. ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतकं केली. पहिल्या डावात 496 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 296 धावांवर सर्वबाद झाली.

3 / 9
टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाल्याने क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यामुळे बॉल टॅम्परिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

4 / 9
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर संशय व्यक्त केला आहे.

5 / 9
13 षटकांनंतर चेंडू अधिक स्विंग आणि बाउन्स होऊ लागला. दरम्यान, चेतेश्वर पुजारा (14) आणि विराट कोहली (14) बाद झाले. येथे पुजारा कॅमरून ग्रीनने टाकलेल्या इनस्विंगवर आऊट झाला, तर विराट कोहली स्टार्कच्या अनपेक्षित बाउन्सरवर झेलबाद झाला.

6 / 9
या षटकांदरम्यान मार्नस लॅबुशेन क्रेप पट्टी बांधून सिली पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत होता. तसेच चेंडूचा पृष्ठभाग क्रेप पट्टीने घासल्याचं सांगण्यात येत आहे.

7 / 9
पृष्ठभागाची चमक काढल्यास चेंडू चांगला रिव्हर्स स्विंग होतो. तसेच चेंडू उसळण्यास मदत होते. त्यामुळे बॉल टॅम्परिंग केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

8 / 9
आयसीसीच्या नियमांनुसार, परवानगी असलेल्या टॉवेलशिवाय कोणत्याही कपड्याने चेंडू पुसता येत नाही.

9 / 9
मैदानी पंच आणि थर्ड अंपायर यांच्या मौनामुळे अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू चिडीचा डाव खेळत असल्याची टीका आता होत आहे.