
विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो. या सामन्यात 55 धावा करताच विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 हजार धावा पूर्ण होणार आहेत. अशी कामगिरी करणार जगातील दुसरा खेळाडू ठरणार आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी, 43 एकदिवसीय आणि 19 टी 20 सामने खेळला आहे. या सामन्यात त्याने एकूण 4945 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 6707 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटच्या आधी फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव आहे.

विराट कोहली सध्या चांगलाच फॉर्मात आहे. आशिया कपपासून त्याला सूर गवसला आहे. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतही त्याने शतक झळकावलं होतं.

आयपीएल 2023 स्पर्धेतही विराट कोहलीने सलग दोन शतकं झळकावली आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा आक्रमक अंदाज पाहून कांगारुंना घाम फुटला आहे. विराटला रोखण्यासाठी कांगारुंनी खास रणनिती आखली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये विराट कोहलीने एकूण 16 सामने खेळला आहे. यात त्याने 32.18 च्या सरासरीने 869 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. यात तो दोन वेळा शून्यावर बाद झाला. तसेच 1938 चेंडूचा सामना केला आहे. यात 101 चौकार आणि दोन षटकार ठोकले आहेत.