Justin Langer Team India | जस्टीन लँगर याला टीम इंडियाच्या बॅट्समनची भीती

ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकाला आजही टीम इंडियाच्या या युवा आणि स्टार बॅट्समनची भीती वाटते. नक्की का आणि कशासाठी?

| Updated on: Jun 10, 2023 | 5:33 PM
1 / 5
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात 2 वेळा कसोटी मालिकेत पराभूत केलंय. टीम इंडियाने 2018-19 आणि 2020-21अशा एकूण 2 वेळा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकलीय. या मालिका विजयात ऋषभ पंत याने निर्णायक भूमिका बजावली. पंतने तेव्हा जे केलं त्यामुळे आजही ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर हैराण आहे.

2 / 5
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 2020-21 मध्ये पराभूत केलं. तेव्हा लँगर ऑस्ट्रेलियाचा कोच होता. तर लँगर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 फायनलमध्ये कॉमेंट्री करतोय. लँगरला कॉमेंट्री करताना पंतची 2021 मध्ये गेमचेंजिग खेळी आठवली.

3 / 5
जेव्हा पंतची ती खेळी आठवतो तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू येतात, असं लँगरने म्हटलं. पंतने तेव्हा 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती.

4 / 5
पंतने सिडनीत तिसऱ्या टेस्टमधील दुसऱ्या इनिंगमध्ये 97 धावा केल्या. पंतच्या या खेळीमुळे सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचं जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.

5 / 5
तर चौथ्या टेस्टमध्ये पंतने नाबाद 89 धावा करत टीम इंडियाला जिंकवलं होतं. टीम इंडियाने या विजयासह 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली होती.