यशस्वी जयस्वालने एकाच दिवसात केला दोनवेळा कारनामा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या दिवशीचा खेळ टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारताने 2 गडी गमवून 318 धावा केल्या.

| Updated on: Oct 10, 2025 | 7:39 PM
1 / 5
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरु आहे. या सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. भारताने पहिल्या दिवशी 2 गडी गमवून 318 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल नाबाद 173 आणि शुबमन गिल नाबाद 20 धावांवर खेळत आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
यशस्वी जयस्वालने 224 चेंडूत 19 चौकार मारून 150 धावा केल्या. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वालने 253 चेंडूत 22 चौकार मारत 173 धावा केल्या आहेत. यात दुसऱ्या दिवशी आणखी भर पडू शकते. यशस्वी जयस्वालची खेळी पाहता दुसऱ्या दिवशी 200 धावांचा पल्ला गाठू शकतो. (Photo- BCCI Twitter)

3 / 5
यशस्वी जयस्वालने पहिल्या दिवशी 150 धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी जयस्वालने 150 धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारतासाठी फक्त विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
2024 मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी जयस्वालने 179 धावा केल्या होत्या. कोहलीने 216 मध्ये विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्ध 151 आणि त्यानंतर 2017 मध्ये दिल्ली येथे श्रीलंकेविरुद्ध 156 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI Twitter)

5 / 5
जयस्वालचे सातवे कसोटी शतक आहे आणि त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एक मोठी कामगिरी देखील केली. केन विल्यमसन आणि मार्नस लाबुशेन यांच्याशी बरोबरी केली आहे. या खेळाडूंनी पाचवेळा एका डावात 150हून अधिक धावा केल्या आहेत. तर जो रूट या यादीत सर्वात पुढे असून त्याने ही कामगिरी 8 वेळा केली आहे. (Photo- BCCI Twitter)