इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल रचणार विक्रम, द्रविड-सेहवागचा मोठा विक्रम मोडणार!

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत युवा फलंदाज यशस्वी जयस्वालकडे इतिहास रचण्याची संधी आहे. यशस्वी जयस्वालच्या रडावर विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांचा रेकॉर्ड आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Jun 19, 2025 | 4:00 PM
1 / 5
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेत सर्वांच्या नजरा या यशस्वी जयस्वालकडे असणार आहे. कारण इंग्लंडविरुद्ध यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर यशस्वी जयस्वालची जबाबदारी वाढली आहे. (Photo- Getty Images)

2 / 5
यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध दोनदा द्विशतक ठोकलं आहे. आता यशस्वी जयस्वालकडे इंग्लंडविरुद्ध खेळताना एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढू शकतो. (Photo- PTI)

3 / 5
यशस्वी जयस्वालने आपल्या छोट्या क्रिकेट कारकि‍र्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता कसोटी सर्वात वेगवान 2 हजार धावा करणारा भारतीय फलंदाज होऊ शकतो. यासाठी त्याला फक्त 202 धावांची आवश्यकता आहे.  (Photo-Getty Images)

4 / 5
यशस्वी जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या 36 डावात 1798 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वात वेगाने कसोटीत 2 हजार धावा करण्याचा विक्रम विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडच्या नावावर आहे. या दोघांनी 40 डावात ही कामगिरी केली आहे. (Photo- AFP)

5 / 5
शस्वी जयस्वालने आतापर्यंत 19 कसोटी सामन्यात 4 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली आहेत. यशस्वी जयस्वाल कसोटीत आक्रमक फलंदाजी करतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव असतो. त्याने खेळपट्टीवर जम बसवला तर प्रतिस्पर्धी संघाचं गोलंदाजी करणं कठीण होऊन बसतं. (Photo : Gareth Copley/Getty Images)