यशस्वी जयस्वालची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी, द्रविड-सेहवागचा विक्रम मोडला

भारत इंग्लंड दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताकडे विजयाची संधी आहे. पण गोलंदाजांना दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करावी लागेल. असं असताना दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने जबरदस्त कामगिरी केली आणि सेहवाग-द्रविडचा विक्रम मोडला.

| Updated on: Jul 05, 2025 | 3:18 PM
1 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वालने नवा अध्याय लिहिला आहे. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ही कामगिरी केली. यासह त्याने दिग्गज राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. (फोटो- बीसीसीआय)

2 / 5
एजबेस्टन कसोटीच्या दोन्ही डावात मिळून यशस्वी जयस्वालने 115 धावांची खेळी केली. त्याने पहिल्या डावात 87 धावा, तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. यासह यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. (फोटो- बीसीसीआय)

3 / 5
यशस्वी जयस्वाल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2000 धावा करणार भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर होता. (फोटो- बीसीसीआय)

4 / 5
राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 25 कसोटी सामन्यातील 40 डावात 2000 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सर्वात कमी सामन्यात आणि कमी डावात 2 हजार धावा करणारे फलंदाज ठरले होते. मात्र हा विक्रम आता यशस्वीने मोडला आहे. (फोटो- टीव्ही 9 हिंदी फाईल)

5 / 5
यशस्वी जयस्वालने 21 कसोटी सामन्यांच्या 40 डावात 2 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. तसं पाहिलं तर 2000 धावा करण्यासाठी 40 डाव लागले. पण 4 कसोटी त्यांच्या तुलनेत कमी खेळला. (फोटो- बीसीसीआय)