
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाच्या खेळाडूंच्या खेळाडूंनी धमाका केला आहे.

टीम इंडियाचा युवा सलामीवीर मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने विराट कोहली याला मागे टाकलं आहे. यशस्वीने टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये विराट कोहली याला पछाडत 10 व्या स्थानावरुन आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.

विराटला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळल्याने मोठा फटका बसला आहे. विराटला एका स्थानाचा फटका बसलाय. विराटची आठव्या क्रमांकावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे.

यशस्वी जयस्वाल याने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील 9 डावांमध्ये 2 द्विशतकांच्या मदतीने 712 धावांची खेळी केली. यशस्वीने 89 सरासरीने या धावा केल्या.

यशस्वीने इंग्लंड विरुद्ध फेब्रुवारी महिन्या केलेल्या कामगिरीसाठी त्याचा आयसीसीने सन्मान केला. यशस्वीने केन विलियमसन याला मागे टाकत फेब्रुवारी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला.

तर आर अश्विन जगात भारी ठरलाय. अश्विनने जसप्रीत बुमराह याला मागे टाकून आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलंय.