
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू राष्ट्रासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. गोपालगंजमध्ये त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

हिंदू एकजूट राहिला तर त्यांना कोणी तोडू शकत नाही, असे ते म्हणाले. मधाच्या पोळ्याला दगड मारला तर दगड मारणाऱ्याला पळ काढावा लागतो. त्यामुळे हिंदूंनी एकजूट राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपण कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी येथे आलो नाही. हिंदूच्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी आलो असे ते गोपालगंजमध्ये माध्यमांशी बोलले.

आपण हिंदुत्वाचा विचार घेऊन आल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे काही महिन्यांनी बिहारची निवडणूक आहे.

हिंदू राष्ट्रासाठी संविधानात, राज्य घटनेत बदल करण्यात यावा अशी मागणी करून त्यांनी वाद ओढावून घेतला. शास्त्री हे 6 मार्च ते 10 मार्च या दरम्यान गोपालगंज येथे हनुमान कथेसाठी दाखल झाले आहेत.

आपण राज्यघटनेचा आदर करतो. यापूर्वी राज्यघटनेत 125 हून अधिक काळ सुधारणा, दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे हिंदू राष्ट्रासाठी एक संशोधन होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.