
बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशीरा जेवायला बसतात. रात्रीच्या भात खाल्ल्याशिवाय अनेकांना पोट भरल्यासारखे वाटत नाही. मात्र,रात्री जेवणात भात खाल्ल्याने अनारोग्याला आमंत्रण ठरु शकते.

वजन वाढणे - भातात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे शरीरात कॅलरी भरपूर जाते. रात्री शारीरिक हालचाली कमी असल्याने कार्बोहायड्रेट्स जास्त घेतल्याने या कॅलरी चरबीच्या रुपात शरीरात साठतात. झोपताना शरीराची चयापचय क्रिया मंदावलेली असते.त्यामुळे भारतातील कॅलरी बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढू शकते.

रक्तातील साखर वाढते - भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जादा असतो.त्यामुळे भाताचे सेवन करताच रक्तातील साखरेची पातळी वाढते. रात्री झोपताना भात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह किंवा इन्सुलिनची निर्मिती बंद असलेल्या लोकांना टाईप-२ डायबिटीस होऊ शकतो.

अपचन - रात्री भात खाल्ल्याने काही लोकांना पोट फुगलेले किंवा पचनाची समस्या जाणवते. भातातील कार्बोहायड्रेट्स पचन मंदावू शकतात.पचन शक्ती कमी असलेल्या लोकांना आम्लपित्त, गॅस आणि अपचन होऊ शकते.

रात्रीच्यावेळी भाताच्या ऐवजी फायबर युक्त मल्टीग्रेन चपाती तुम्ही खाऊ शकता. प्रोटीन असलेले क्विनोआ हे भाताला पर्याय ठरु शकते. बाजरी देखील पचायला सोपी असते आणि भातापैक्षा तिच्यात कमी हार्बोहायड्रेट्स असतात.

डलिया मध्ये भरपूर फायबर असते. आणि पचन प्रक्रिया देखील त्याने चांगली होते. मुग डाळ खिचडी देखील तुम्ही खाऊ शकता. यात डाळी आणि भाज्या मिक्स करता येतात.