गणपती बाप्पा सर्वसामान्यांना पावला; साखरेच्या किंमतीत मोठी घसरण, आजचा दर काय?
सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. साखरेच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. मुंबईतही साखरेच्या किंमतीत घसरण झाली आहे.

ऐन गणेशोत्सवात सर्वसाम्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील विविध भागात साखरेच्या दरात घसरण झाली आहे.
देशातील विविध शहारातील 22 ऑगस्टच्या तुलनेत 12 सप्टेंबर रोजी साखरेची किंमत 12 रुपये ते 16 रुपयांनी घसरली आहे. ऑगस्ट महिन्यात साखर 70 रुपये प्रतिकिलो पोहोचली होती. यानंतर आज साखरेच्या दरात घरसरण झाली.
सरकारने साखर कारखान्यांना साठा मर्यादा कमी केला आहे. सरकारने कारखान्यातील साठ्याची मर्यादा ही 4000 क्लिंटलवरून 2000 क्लिंटलपर्यंत घट केली आहे. तसेच साखर जास्तीत जास्त 30 दिवसांत विकावी लागणार आहे.
कानपूरमध्ये साखरेची किंमत 69 रुपयांवरून 53 रुपयांवर पोहोचली आहे. तर रांचीमध्ये 70 रुपयांवरून 55 रुपयांवर किंमत पोहोचली आहे. कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये 22 दिवसांत 15 रुपयांनी भाव घसरला. मुंबईत 68 रुपयांची साखर ही 54 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत 14 रुपयांनी साखरेच्या किंमतीत घसरण झाली.
सरकारने आता साखरेची साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सर्व कारखान्यांना आता साठा, उत्पादन, विक्री, शिल्लक साठा इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.