Post Office Schemes : मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवा पैसे; 21 वर्षांनी मिळतील 44 लाख रूपये
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारी योजना मुलींसाठी एकदम उत्तम आहे. त्यात दरमहा काही पैसे गुंतवून 21 वर्षांनी 44 लाख रूपयांपर्यंत रक्कम मिळवता येते. मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.

मुलगी जन्माला आली की तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या भविष्याची चिंता पालकांना असते. तिच्यासाठी आतापासूनच गुंतवणूक केली तर भविष्यात मोठी रक्कम उभी राहू शकते. त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा पर्याय एकदम बेस्ट आहे.
काय आहे सुकन्या समृद्धी योजना ? : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची मुलींसाठी असलेली छोटी बचत योजना आहे. मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी पालक खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडू शकतात.
या योजनेत कमीत कमी 250 रूपये आणि जास्तीत जास्त 1 लाख 50 हजार रूपये जमा करता येतात. दरमहा 8 हजार रूपये जमा केल्यास वर्षाला 96,000 रूपये गुंतवले जातात.
21 वर्षांनी किती पैसे मिळतात? : सध्या या योजनेवर वार्षिक 8.2 टक्के व्याज 21 वर्षे कायम मिळत राहिल्यास 21 वर्षानंतर तुम्हाला 44.4 लाख रूपये मिळू शकतात. 44 लाख मिळणे हे व्याज दरावर अवलंबून असेल. रक्कम कमी जास्त देखील असू शकते.
कोण उघडू शकतं हे खाते ? : मुलगी 10 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या नावाने हे खाते उघडता येते. एका मुलीच्या नावाने खाते उघडता येते. सामान्यत: एका कुटुंबातील दोन मुलींसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. जुळ्या किंवा तिळ्या मुलींच्या जन्मासंबंधी नियमांनुसार काही अपवाद आहे.
सुकन्या समृद्धी खात्याची मुदत खाते उघडल्यास तारखेपासून 21 वर्षांनी पूर्ण होते. मात्र मुलगी 18 वर्षांची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर, यापैकी जे आधी होईल त्या वेळी उच्च शिक्षणासाठी खात्यातील मागील आर्थिक वर्षांच्या अखेरीस 50 टक्क्यांपर्यंत काढता येते.