AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Fire: दिवाळीच्या आनंदावर विरजण, रॉकेट थेट फ्लॅटमध्ये घुसलं अन्… रायगडमध्ये भयंकर दुर्घटना!

पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये फटाक्यांच्या रॉकेटमुळे भीषण आग लागली. या आगीत तीन फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Raigad Fire: दिवाळीच्या आनंदावर विरजण, रॉकेट थेट फ्लॅटमध्ये घुसलं अन्... रायगडमध्ये भयंकर दुर्घटना!
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 5:46 PM
Share

राज वैशमपायन, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी:

Raigad Fire Incident:  राज्यभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी होत असतानाच आगीच्या दुर्दैवी घटनाही घडत आहेत. मुंबईमध्ये फटाक्यांमुळे आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आता रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रायगडच्या पेणमध्ये रॉकेट थेट बेडरूममध्ये घुसल्याने सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटचे मोठे नुकसान झालं आहे.

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी मोठी दुर्घटना, 3 फ्लॅट्सचे नुकसान 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि रोषणाईचा उत्सव… मात्र याच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील पेण शहरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पेण शहरातील उत्कर्ष नगर परिसरातील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये फटाक्यांच्या रॉकेटमुळे भीषण आग लागली. या आगीत तीन फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रेम तेलवणे यांचा फ्लॅट पूर्णतः जळून खाक झाला आहे.

प्रेम तेलवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना एक रॉकेट थेट त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये घुसले. बेडरूममधील बेडवर असलेल्या बेडशीटवर हे रॉकेट पडल्याने बेडशीटने पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीची झळ शेजारील फ्लॅटलाही बसली असून विजय प्रसाद आणि अमित ईगावले यांच्या फ्लॅटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे तीन कुटुंबांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. सणाच्या उत्साहात उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांमधील एका रॉकेटमुळे संपूर्ण कुटुंबांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. फटाक्यांची आतषबाजी करताना योग्य ती खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देणारी ही घटना पेणमध्ये घडली आहे.

मुंबईत फटाक्यांवर बंदी! 

दरम्यान, मुंबई शहर व उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत फटाक्यांमुळे १३७ पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.  मुंबईमधील विविध भागात या आगीच्या घटना घडल्या आहेत. शहरात फटाक्यांमुळे झालेल्या आगीच्या दुर्घटनानंतर पालिका प्रशासन सतर्क झाले असून रॉकेट सारख्या हवेत जाऊन उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे.

Follow Us
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?’; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान...
गोकुळ दूध संघात ‘चेअरमन की चोरमन?; नामनिर्देशित सदस्यांच्या मतदान हक्कावरून विवेकानंद पाटील आक्रमक!