
सिनेसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांचं मन जिंकते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

आता काही जुने फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

निळ्या रंगाचा फ्लोरल बॅकलेस ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.

‘#throwbackthursday ?’ असं कॅप्शन देत ती जुन्या आठवणींमध्ये रमली आहे.

चाहत्यांनाही तिचा हा अंदाज प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय.

सोनाली कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. लवकरच सोनाली 'झिम्मा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर येत्या काळात ती 'छत्रपती ताराराणी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं असून, चाहत्यांमध्ये सोनालीला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेमध्ये पाहण्याची आतुरता वाढली आहे.