
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे राजकिय घडामोडींनी वेग घरला आहे. दादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची मोठी बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या माहेरच्या मंडळींचं मत देखील समोर आले आहे. सुनेत्रा पवार यांचं प्राथमीक शिक्षण धाराशिव मधील तेर जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं.

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. शिवाय सुनेत्रा पवार यांच्यासोबत आजही चांगले संबंध आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या योग्य निर्णय घेतील... अशा विश्वास त्यांच्या माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला.

सुनेत्रा पवार यांच्या पवार यांच्या गावातील त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सुनेत्रा पवार या अगदी धाडसाने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील... अशा आत्मविश्वास तेर मधील गावकऱ्यांनी व्यक्त केला.

एकीकडे अजित पवार गेल्याचे दुःख तर दुसरीकडे आमची लेक उपमुख्यमंत्री होणार याचाही आनंद आहे.... तेर गावातील ग्रामस्थांनी अशा भावना व्यक्त केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.