हार्मोन्सचे संतुलन, मासिक पाळीसाठी सूर्यफुलाच्याच्या बिया लाभदायक, महिलांसाठी होणारे फायदे

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनियमचे प्रमाण जास्त असतं. जे रोगप्रतिकारक शक्तीला समर्थन देण्यास मदत करते. सूर्यफुलाच्या बियांचे महिलांसाठी तर अनेक फायदे आहे... तर जाणून घेऊ सूर्यफुलाच्या बियांचे महिलांना होणारे फायदे...

| Updated on: Dec 23, 2025 | 3:41 PM
1 / 5
 सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन E भरपूर असते, जे महिलांमधील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे मासिक पाळीपूर्वी होणारे त्रास कमी होऊ शकतात.

2 / 5
 त्वचा आणि केसांसाठी देखील सूर्यफुलाच्या बिया फायदेशीर आहेत. व्हिटॅमिन E मुळे त्वचा निरोगी, चमकदार राहते तर, केस गळणे कमी होण्यास मदत होते. त्वचेचे अकाली वृद्धत्व (wrinkles) कमी होण्यास देखील सूर्यफुलाच्या बिया उपयोगी ठरतात.

3 / 5
सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात, जे महिलांच्या हाडांसाठी महत्त्वाचे आहेत, विशेषतः भविष्यात होणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी होते.

4 / 5
हृदयाच्या आरोग्यासाठी देखील सूर्यफुलाच्या बिया चांगल्या आहेत. यामध्ये असलेले चांगले फॅट्स (Healthy Fats) आणि अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात व कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात.

5 / 5
सूर्यफुलाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असतं , ज्यामुळे ताण, चिंता आणि थकवा कमी होण्यास मदत होते. मन शांत ठेवण्यासाठीही या बिया उपयोगी ठरतात. त्यात असलेल्या फायबर आणि प्रोटीनमुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते, त्यामुळे अति खाणे टाळले जाते.