
बॉर्डरच्या पहिल्या भागात सुनील शेट्टीने सनी देओलसोबत काम केलं होतं. आता बॉर्डरमध्य सनी देओलसोबत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ यांच्या सुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मागच्या आठवड्यात बॉर्डर 2 चा प्रीमियर झाला. त्यावेळी मुलगा अहान शेट्टीला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेट्टीला प्रीमियर आला. पण तो थिएटरच्या आत गेला नाही. सुनील शेट्टी थिएटरच्या आत का आला नाही? असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला.

सुनील शेट्टीची पत्नी माना, मुलगी अथिया आणि जावई केएल राहुल यांनी अहानसोबत बॉर्डर 2 चित्रपट बघितला. मिड डे च्या वृत्तानुसार सुनील शेट्टी त्या दिवशी साडेतीन तास थिएटर बाहेर बसून होता. येणाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. पण तो थिएटरच्या आत गेला नाही.

जो पर्यंत बॉर्डर 2 जगभरात 500 कोटींची कमाई करणार नाही तो पर्यंत मी हा चित्रपट पाहणार नाही असं पहिल्या दिवसापासून बोलतोय. मी अहानसाठी नवस बोललोय. आतापर्यंत मी चित्रपटाची एकही फ्रेम पाहिलेली नाही. मला चुकीचं समजू नका किंवा उद्धट समजू नका.

जे.पी.दत्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या बॉर्डरमध्ये सुनील शेट्टीने सहाय्यक कमांडट भैरव सिंह राठोरची भूमिका साकारली होती. 1997 साली आलेला हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. बॉर्डर 2 हा त्याचाच सीक्वल आहे.