Surya Gochar 2026: सूर्याच्या गोचरामुळे या 3 राशींना होणार फायदा! होणार धनलाभ, तुमची रास आहे का? पाहा
Surya Gochar 2026: वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य ग्रहाचा विशाखा नक्षत्रात प्रवेश करणे काही राशींच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या लोकांना भाग्याचा भरपूर साथ मिळेल.

सूर्य ग्रह धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी स्वाती नक्षत्रातून विशाखा नक्षत्रात गोचर करणार आहे. सूर्याचा नक्षत्र गोचर ६ नोव्हेंबर २०२६ शुक्रवारी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी होणार आहे. २० नोव्हेंबरपर्यंत सूर्य याच नक्षत्रात राहणार आहे. यानंतर तो अनुराधा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्य गोचराने या भाग्यवान राशींना करिअर, धन आणि भाग्याच्या बाबतीत लाभ होईल. करिअरमध्ये यशाचे योग बनतील. आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. तुमच्यातील आत्मविश्वासात वाढ होईल.
सूर्य नक्षत्र गोचर धनु राशीच्या लोकांना लाभ देईल. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना यश मिळू शकते. भाग्याची साथ मिळेल.
सूर्याचा गुरुच्या नक्षत्र विशाखेत असणे कर्क राशीला शुभ परिणाम देईल. तुम्हाला भाग्याची भरपूर साथ मिळेल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला यश मिळेल. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.
मीन राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. कामाकाजात यश मिळेल. व्यापाऱ्यांसाठी काळ चांगला राहणार आहे. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)