Surya Ketu Gochar 2025 : सूर्य-केतूचे होणार गोचर! ‘या’ 3 राशींसाठी उघडणार संपत्तीचा खजिना; सगळ्या इच्छा होणार पूर्ण

ग्रहांचा राजा सूर्य आणि क्रूर ग्रह केतू यांनी एकाच दिवशी नक्षत्र परिवर्तन केले आहे. हा दुर्मीळ योग अनेक वर्षांनंतर आला आहे. कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या...

| Updated on: Jul 07, 2025 | 2:50 PM
1 / 5
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य आणि क्रूर ग्रह केतू यांनी एकाच दिवशी, आज ७ जुलै रोजी नक्षत्र परिवर्तन केले आहे. हा दुर्मीळ योग अनेक वर्षांनंतर आज घडून आला आहे. यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता या राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया...

2 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तर केतू दर दीड वर्षांनी राशी बदलतो. मात्र, या काळात केतू नक्षत्र परिवर्तनही करतो. यंदा सूर्य आणि केतू एकाच नक्षत्रात आले आहेत. 6 जुलै 2025 रोजी सूर्याने पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश केला आहे, ज्याचे स्वामी गुरु (बृहस्पती) आहेत. दुसरीकडे, केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. यामुळे 7 जुलैपासून तीन राशींना सकारात्मक परिणाम मिळतील. त्या राशी खालीलप्रमाणे आहेत:

3 / 5
सूर्य आणि केतूच्या नक्षत्र बदलाचा मेष राशीवर सकारात्मक परिणाम होईल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. नवीन उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील आणि तुमच्या कष्टांचे फळ मिळेल. नोकरीच्या नवीन ऑफरही तुम्हाला मिळू शकतात.

4 / 5
कुंभ राशीला सूर्य-केतूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सकारात्मक फायदे मिळतील. करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि कामात प्रगती दिसेल. आर्थिक लाभ होईल, तसेच नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार आणि नवीन उपक्रमांना सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

5 / 5
सिंह राशीसाठी हा नक्षत्र बदल भाग्यवर्धक ठरेल. करिअरमध्ये प्रगती होईल आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योगही जुळून येतील. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.