ज्याला हिंदी शिकायची त्याने जरुर शिका, पण…; स्वप्नील जोशीने मांडलं परखड मत

राज्यात मराठी सक्तीवरुन सध्या वाद सुरु आहे. त्यावर सर्वजण प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशीने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.

| Updated on: Jul 19, 2025 | 5:38 PM
1 / 5
मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेता स्वप्नील जोशीने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

2 / 5
अभिनेता स्वप्नील जोशी एका कार्यक्रमासाठी गेला होता. त्याला तेथे मराठी भाषेच्या सक्तीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी स्वप्नीलने परखड मत मांडलं आहे.

3 / 5
स्वप्नील जोशी म्हणाला, 'मराठी कलाकार आणि अभिनेता या पलिकडे जाऊन मी मराठी माणूस आहे. महाराष्ट्रात राहातो. माझं वैयक्तिक स्वत:चं मत असं आहे की हिंदीची सक्ती असू नये.'

4 / 5
पुढे स्वप्नील म्हणाला, 'ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने जरुर शिकावं. पण हिंदी शिकलीच पाहिजे अशी शक्ती असू नये या मताचा मी आहे.'

5 / 5
सध्या सर्वत्र स्वप्नीलने दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा सुरु आहे.