प्राजक्ताच्या हातावर लागली शंभुराजांच्या नावाची मेहंदी; लग्नाची जय्यत तयारी

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. प्राजक्ताच्या हातावर होणारे पती शंभुराज यांच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

Updated on: Nov 30, 2025 | 2:33 PM
1 / 5
अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. हीच प्राजक्ता आता लग्नबंधनात अडकणार असून नुकताच तिचा मेहंदीचा कार्यक्रम धूमधडाक्यात पार पडला.

2 / 5
प्राजक्ताच्या हातावर होणारा नवरा 'शंभुराज'च्या नावाची मेहंदी लागली आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमाचे खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

3 / 5
डिसेंबर महिन्यात प्राजक्ता आणि शंभुराजचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी प्राजक्ताचा घाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम पार पडला. लग्नापूर्वीच्या विविध विधींचे फोटो आणि व्हिडीओ प्राजक्ताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पहायला मिळत आहेत.

4 / 5
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता आणि शंभुराजच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात लग्नाची तारीख 2 डिसेंबर 2025 आणि मुहूर्त दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी असल्याची माहिती होती. प्राजक्ता लवकरच तिच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे.

5 / 5
प्राजक्ताने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलंय. परंतु अभिनयाची आवड असल्याने तिने अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. विविध मालिकांमधून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.