
अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.

2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.

या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.

अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.

दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.