
टी-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश सामन्यामध्ये मोठा विक्रम रचला गेला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिली हॅट्रिक या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने घेतलीये. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशमधील सुपर 8 सामन्यात कमिन्सने हा कामगिरी केली.

बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 140 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 141 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 100 धावा करत सामना जिंकला. पावसाने खोडा घातल्यामुळे डकवर्थ लुईसनुसार बांगलादेशने हा सामना खिशात घातला.

बांगलादेश संघ बॅटींग करत असताना पॅट कमिन्सने हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला. पॅट कमिन्स घेतलेल्या तीन विकेटमध्ये महमुदुल्लाह या खेळाडूचा समावेश होता. मात्र महमुदुल्लाह याच्या नावावर एक वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा आऊट होण्याचा विक्रम महमुदुल्लाहच्या नावावर झाला आहे. महमुदुल्लाह टी-20 मध्ये तीनवेळा वन डे क्रिकेटमध्ये दोनदा आणि कसोटी क्रिकेटमध्येही एकदा हॅट्ट्रिकचा शिकार ठरला आहे.

बांगलादेश संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातवेळा हॅक्ट्रिक घेण्यात आलीये. यामध्ये बांगलादेशचा महमुदुल्लाह तीनवेळा शिकार ठरला आहे.