AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओटीटीवर 1 तास 56 मिनिटांच्या चित्रपटाचा धुमाकूळ, अवघ्या काही तासांत नंबर 1; आईच्या संघर्षाची थरारक कहाणी

OTT: अॅक्शन, भावनिक संघर्ष आणि आईच्या आपल्या मुलीसाठीच्या लढ्याची कथा यामुळे या चित्रपटाने ओटीटीवर चांगली सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:19 AM
Share
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तापसीची प्रमुख भूमिका असलेला ‘गांधारी’ हा अॅक्शन-क्राइम थ्रिलर 3 सप्टेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. रिलीज होताच या चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, तो नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत नंबर 1 वर पोहोचला आहे.

1 / 5
‘गांधारी’ची कथा एका आईभोवती फिरते. तापसी पन्नूने चित्रपटात बानी नावाच्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर ती मुलीचा शोध घेण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होते. या प्रवासात तिच्यासमोर अनेक धोकादायक अडथळे येतात. मात्र मुलीला परत मिळवण्याचा निर्धार तिच्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद देतो.

2 / 5
चित्रपटाची कथा केवळ अॅक्शनवर आधारित नसून त्यामध्ये आईच्या भावनिक संघर्षालाही महत्त्व देण्यात आलं आहे. एका आईला आपल्या मुलाच्या सुरक्षेबद्दल वाटणारी भीती आणि त्याच मुलासाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची तिची तयारी हा या चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू आहे.

3 / 5
‘गांधारी’मधून तापसी पन्नू पुन्हा एकदा अॅक्शन भूमिकेत दिसत आहे. बानीची भूमिका शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याचंही चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे. ‘गांधारी’ची पटकथा आणि निर्मिती कनिका ढिल्लन यांनी केली असून दिग्दर्शन देवाशीष मखीजा यांनी केलं आहे. तापसी आणि कनिका यांची ही पुन्हा एकत्र आलेली जोडी आहे. याआधी दोघांनी ‘हसीन दिलरुबा’ आणि ‘फिर आई हसीन दिलरुबा’सारख्या प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.

4 / 5
चित्रपटात तापसीसोबत इश्वाक सिंह, छाया कदम, स्वस्तिका मुखर्जी, मिता वशिष्ठ आणि जतिन सरना यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयासोबतच भूमिकेसाठी त्यांनी केलेल्या भाषेच्या तयारीचीही सोशल मीडियावर चर्चा झाली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...