
वर्ष 1998 साली 'कलीरें' नावाच्या शो मधून श्वेता तिवारी टीव्हीवर डेब्यू केला. पण तिला खरी ओळख 2001 साली आलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेद्वारे मिळाली. या शो मध्ये तिने प्रेरणाची भूमिका साकारलेली. आजही लोक तिला या शो साठी ओळखतात.

श्वेता तिवारीने अनेत टीवी शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलय. तिला डेब्यू करुन 27 वर्ष झालीत. पण आजही तिची पॉप्युलरिटी कायम आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते.

श्वेता तिवारीने आपल्या करिअरमध्ये फक्त लोकप्रियताच नाही, तर पैसाही भरपूर कमावला. रिपोर्ट्सनुसार 44 वर्षांची श्वेता तिवारी जवळपास 81 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

श्वेता तिवारीशिवाय अजून एक नाव आहे, जिच्या पॉप्युलरिटीमध्ये अजिबात फरक पडलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून एकाच भूमिकेद्वारे ती प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. ती कलाकार आहे मुनमुन दत्ता.

लोकप्रियतेत मुनमुन दत्ता श्वेता तिवारीपेक्षा फार मागे नाहीय. पण संपत्तीच्या बाबतीत बरीच मागे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुनमुन दत्ताचा नेटवर्थ 40 कोटी रुपये आहे. मुनमुन दत्ता इतकी लोकप्रिय आहे की, ती तिच्या खऱ्या नावापेक्षा बबिताजी या नावाने प्रसिद्ध आहे.