पाहतेयस ना काजोल…; अजय देवगण-तब्बू यांच्यातील केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
'दृश्यम 3'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अजय देवगण आणि तब्बू यांच्यातील केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर थेट अजयची पत्नी काजोलला टॅग केलं आहे.

अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता ‘दृश्यम: द कन्क्लुजन’च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान दोघांमधील खास बॉन्डिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. अजय आणि तब्बू यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. विशेष म्हणजे, अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोलचं नावही या चर्चेत आलं.
‘दृश्यम’ फ्रँचायजीमध्ये अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत, तर तब्बू मीरा देशमुखच्या भूमिकेत दिसते. दोन्ही पात्रांमध्ये संघर्षाचं नातं असलं तरी प्रत्यक्ष आयुष्यात अजय आणि तब्बू यांची मैत्री जुनी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघंही एकत्र दिसत असून त्यांची सहज बॉन्डिंग चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
ट्रेलर लॉन्चच्या वेळी अजय आणि तब्बू एकमेकांच्या जवळ उभे असतानाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्स करण्यास सुरुवात केली. काहींनी तर अजयची पत्नी काजोलचा उल्लेख करत ‘काजोल हे पाहत आहेस का?’ अशा अंदाजातील प्रतिक्रिया दिल्या.
गोव्यात झालेल्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातील अजय आणि तब्बूचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांचं लक्ष त्यांच्या बॉन्डिंगकडे वेधलं गेलं आहे.
अजय आणि तब्बूची जवळीक पाहून काही चाहत्यांनी काजोलचाही उल्लेख केला. अजय देवगण आणि काजोल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी असल्यामुळे अशा प्रसंगी चाहत्यांकडून काजोलचा संदर्भ येणं नवीन नाही.
'दृश्यम 3' या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तब्बूची मीरा देशमुख पुन्हा परतली असून तिच्यासोबत जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.