
आज प्रत्येकाकडे दुचाकी असते. पावसाळ्यात दुचाकीची सर्व्हिसिंग केली नाही तर मग प्रवासात कटकट होतेच. बाईक वेळेवर बंद पडते नाही तर काही ना काही कुरबुर निघते. तेव्हा या चुका चुकनही करु नका.

बाईकची चाकं सुस्थितीत आणि गतीने पळावी यासाठी चेन वेळोवेळी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. चेनची लूबिंग करणे, त्याला ग्रीस असणे आवश्यक आहे. चेनची तपासणी केली तर चेन उतरत नाही.

बाईकचे इंजिन ऑईल पण तपासा, ते कमी असेल अथवा खराब झाले असेल तर बाईकच्या कामगिरीवर आणि वेगावर परिणाम होतो. बाईकचे मायलेज वाढवण्यासाठी बाईकचे इंजिन ऑईल तपासा.

ब्रेक पॅड, ब्रॅ्क कॅलीपर आणि रोटर यादरम्यान असते. तो डिस्क ब्रेकचा एक भाग असतो. त्याआधारे बाईकचा वेग कमी करता येतो अथवा दुचाकी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ब्रेक पॅड त्यामुळे सतत तपासात राहा.

ब्रेक पॅडसह ब्रेक ऑईल तपासणे पण आवश्यक आहे. त्यामुळे दुचाकीचा वेग नियंत्रणात येतो. ब्रेक ऑईल तपासले तर अपघात होण्याची शक्यता कमी होते.

कुलंट त्या बाईकसाठी आहेत, ज्यात लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात येते. इंजिन जेव्हा जास्त गरम होते. त्यावेळी तिला थंड करण्यासाठी आणि दुचाकी सहज चालण्यासाठी कुलंटचा वापर होतो.