Stock Split: गुंतवणूकदारांची धुळवड! 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा, आता स्टॉकचे दोन तुकडे, कमाईच कमाई
Tanfac Industries Ltd Stock : या कंपनीने गुंतवणूकदारांना गेल्या दहा वर्षांत 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. आता या कंपनीचा शेअर दोन तुकड्यात विभागला जाणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल.

Tanfac Industries Stock Split: या कंपनीने गुंतवणूकदारांना 10 वर्षांत 15,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. टॅनफॅक इंडस्ट्रीज लिमिटेडने शेअरचे दोन तुकड्यात विभाजनाचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा शेअर दोन तुकड्यात विभागला जाईल. कंपनीने स्टॉक स्प्लिटची तारीख घोषणा केली आहे.

टॅनफॅक इंडस्ट्रीज लिमिटेडने शनिवारी स्टॉक एक्सचेंजला याविषयीची माहिती दिली. 10 रुपयांच्या फेसव्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरला दोन तुकड्यात विभागलं जाणार आहे. या स्टॉक स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू कमी होणार आहे.

दोन तुकड्यात शेअर विभागला जाईल. फेस व्हॅल्यू कमी होऊन 5 रुपयांवर प्रति शेअर होईल. कंपनीने याविषयीची माहिती शेअर बाजाराला दिली. स्टॉक स्प्लिटसाठी 9 मार्च 2025 रोजीची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचा शेअर्स पहिल्यांदाच दोन तुकड्यात विभागला जाईल.

शुक्रवारी Tanfac Industries चा शेअर बीएसईवर 0.23 टक्क्यांच्या तेजीसह 4161.05 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या एका वर्षांत कंपनीच्या शेअरची किंमत 27 टक्क्यांनी वधारली. या काळात सेन्सेक्स इंडेक्समध्ये 8.95 टक्क्यांची उसळी आली.

कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांक बीएसईमध्ये 5064.30 रुपये आणि 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 2510 रुपये आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4150.65 कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरमध्ये 118 टक्क्यांची तेजी दिसली. तर तीन वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 342 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.