Tanushree Dutta: ‘कपडे काढ अन्…’ तनुश्री दत्तासोबत सेटवरच गैरवर्तन; केली इंडस्ट्रीची पोलखोल

Tansuhree Dutta Exposed Indurty: तनुश्री दत्ताने नुकताच एक अनुभव बोलून दाखवला आहे. ज्यात तिला थेट कपडे काढ असं म्हणण्यात आले आहे.

| Updated on: Oct 13, 2026 | 2:34 PM
1 / 6
अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. ती नेहमीच स्पष्टवक्ती राहिली आहे. तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये तनुश्रीने इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. एका दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर तिच्याशी कसे गैरवर्तन केले, याचे तिने वर्णन केले आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. ती नेहमीच स्पष्टवक्ती राहिली आहे. तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये तनुश्रीने इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. एका दिग्दर्शकाने चित्रपटाच्या सेटवर तिच्याशी कसे गैरवर्तन केले, याचे तिने वर्णन केले आहे.

2 / 6

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली, फक्त नाना पाटेकर यांच्यासंदर्भात वाईट अनुभव आलेला नाही तर, 'चॉकलेट' चित्रपटात एक डान्स सिक्वेन्स होता. त्या सीनमध्ये मला पाण्याखाली डान्स करायचा होता. दिग्दर्शक ज्या पद्धतीने माझ्याशी बोलला, ती पद्धत अश्लील होती. दिग्दर्शकाने मला कपडे काढून डान्स करायला सांगितले. मिस इंडिया किंवा कोणत्याही व्यक्तीशी असे बोलणे योग्य नाही."

3 / 6

"मी त्याबद्दल बोलले तेव्हाही बोलले. मी त्याचा मुद्दा बनवला नाही; माध्यमांशी बोलताना तो विषय सहजच समोर आला. मी दिग्दर्शकाचे नावही घेतले नाही. तो स्वतः पुढे आला आणि त्याने स्पष्टीकरण दिले. तो माझ्यावर अंगावर आला."

4 / 6

"आजपर्यंत तो याबद्दल वाट्टेल ते मूर्खपणाचं बोलत आला आहे. मी मिस इंडियाच्या पार्श्वभूमीतून आले आहे. मी एका सभ्य कुटुंबातून आले आहे. मी माझ्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशीसुद्धा नम्रपणे बोलते.मला हे अजिबात आवडलं नाही. तुमच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर तुम्ही कोणाशी उद्धटपणे कसे बोलू शकता? हे चुकीचं आहे."

5 / 6

"त्याने मला थेट माझे कपडे काढून नाचायला सांगितले. त्या सीनसाठी मला माझा गाऊन काढावा लागला. तुम्ही त्याच्याशी नम्रपणे बोलू शकला असता. मी तेव्हा नवीन होते, म्हणून मी काही बोलले नाही. मी दिग्दर्शकाकडे एकटक पाहिले आणि शांतपणे तो सीन केला. दिग्दर्शकाच्या बोलण्याने तिथे उपस्थित असलेल्या इतरांना वाईट वाटले. सगळ्यांनाच ते अपमानकारक वाटले."

6 / 6

'चॉकलेट' हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला होता. तनुश्रीने मुलाखतीत नानांच्या नावाचा उल्लेख केला नाही, पण ज्यांना तिचा इशारा समजला, त्यांना तो कळला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us