AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garam Masala : घरातच बनवा गरम मसाला, जाणून घ्या अत्यंत सोपी पद्धत, प्रत्येक पदार्थ होईल चविष्ट

Garam Masala : अनेक जण गरम मसाला विकत आणतात, पण अनेकदा त्याची चव आपल्याला आवडत नाही. तर काही महिला घरात गरम मसाला बनवतात. पण प्रमाण चुकल्याने मसाल्याची चव बिघडते... तर जाणून घ्या घरातच कसा बनवाल चविष्ट गरम मसाला...

Garam Masala : घरातच बनवा गरम मसाला, जाणून घ्या अत्यंत सोपी पद्धत, प्रत्येक पदार्थ होईल चविष्ट
| Updated on: Nov 26, 2026 | 2:06 PM
Share

Garam Masala : गरम मसाल्याशिवाय भारतीय लोकांचं जेवण अपूर्ण आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर गरम मसाल्याशिवाय कोणते पदार्थ तयारच होत नाहीत. असं म्हणालया हरकत नाही. आमटी, डाळ, बिर्याणी किंवा कोणताही विशेष पदार्थ असो, थोडा गरम मसाला पदार्थाची चव आणि सुगंध पूर्णपणे बदलून टाकू शकतो. सहसा, बरेच लोक बाजारात मिळणारे पॅकेटमधील गरम मसाले वापरतात. पण, घरी स्वतः गरम मसाला बनवल्यास तो केवळ चविष्टच लागत नाही, तर त्याला नैसर्गिक तिखटपणाही येतो. तो बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही. तुम्ही घारातच फार कमी वेळात गरम मसाले तयार करु शकता.

घरात गरम मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

घरीच गरम मसाला बनवण्यासाठी, तुम्हाला 5 मोठे चमचे धणे, 1 मोठा चमचा जिरे, 1 छोटा चमचा शहाजिरा, 1 मोठा चमचा काळी मिरी, 5 लवंग, 1 जायफळ, 1 दगडफूल, 2 लहान वेलची, 6 हिरव्या वेलची, अर्धे जायफळ, 3 दालचिनीच्या काड्या, 3 सुक्या मिरच्या लागतील. यासोबतच, तुम्हाला 2 छोटे चमचे हळद, अर्धा छोटा चमचा खसखस, अर्धा छोटा चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर हिंग आणि 1cमोठा चमचा कसुरी मेथी लागेल.

सर्वप्रथम, गॅसवर एक कढई गरम करा. हळद, मीठ, हिंग आणि कसुरी मेथी सोडून बाकीचे सर्व साहित्य घालून मंद आचेवर परतून घ्या. साहित्य जळू नये म्हणून सतत ढवळत राहा. छान सुगंध येऊ लागताच गॅस बंद करा. परतलेले साहित्य एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर, त्या घटकांमध्ये हळद, मीठ, आणि कसुरी मेथी घाला. नंतर, हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पूड करा. अशा प्रकारे तुमचा गरम मसाला घरीच तयार होईल…

कोणत्या बरणीत ठेवाल गरम मसाला…

तयार केलेली गरम मसाला पावडर स्वच्छ, पूर्णपणे कोरड्या आणि हवाबंद बरणी साठवून ठेवावी. ओलाव्यामुळे त्याचा सुगंध तर नाहीसा होतोच, पण चवही बिघडते. हा मसाला तिखट आणि सुगंधी असल्यामुळे, स्वयंपाकात तो जास्त प्रमाणात घालण्याची गरज नसते. साधी आमटी बनवताना फक्त अर्धा चमचा गरम मसाला पुरेसा असतो. या मसाल्यामुळे तुमच्या प्रत्येक पदार्थाला चंगली चव येईल.

Follow Us
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल