AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉकेटबंद खाद्यपदार्थ खाताय? सावधान… सुप्रीम कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय

प्रमाणाबाहेर मीठ, साखर आणि फॅट असलेल्या पॅकेटबंद पदार्थांवर समोरच्या बाजूस 'HIGH FAT', 'HIGH SUGAR', 'HIGH SALT' असा वैधानिक इशारा देणारे लाल षटकोनी लेबल लावणे सुप्रीम कोर्टाने सक्तीचे केले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय असून, FSSAI ला चार महिन्यांत नियम तयार करण्याचे आणि शाळांमध्ये पोषण शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.

पॉकेटबंद खाद्यपदार्थ खाताय? सावधान... सुप्रीम कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय
Supreme Court packaged food labelingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 1:56 PM
Share

बाजारातील चिप्स, बिस्किट वा इतर पॅकेटबंद पदार्थ खाताय? मग आताच सावध व्हा. सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीच्या अनुषंगाने याबाबतचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. जस्टिस जे. बी. पारदीवाला आणि जस्टिस के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. अधिक मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटवाले पदार्थ असलेल्या पॉकेटवर दर्शनी भागावर मोठ्या अक्षरात वैधानिक इशारा लिहिण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. संविधान दिनाचं औचित्य साधून कोर्टाने हा निर्णय दिला आहे. संविधानातही आरोग्याच्या अधिकारावर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय देण्यासाठी आजच्या दिवसा सारखा दिवस असू शकत नाही, असं सांगतानाच आजपासूनच हा निर्णय लागू होणार असून यामुळे देश निरोगी होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (FSSAI) कठोर निर्देश दिले आहेत. नव्या आदेशानुसार, प्रत्येक नुकसानकार तत्त्व फॅट, शुगर आणि मीठासाठी वेगवेगळा लाल रंगाचा हेक्सागन (षटकोण) लेबल लावणं आवश्यक आहे. या लेबलवर एका स्पष्ट चित्राासह त्यावर मोठ्या अक्षरात “HIGH FAT”, “HIGH SUGAR” वा “HIGH SALT” लिहिलं जावं. प्रत्येक वर्षी हेक्सागनचा आकार पॅकेटच्या दर्शनी भागावर कमीत कमी 4 ते 5 टक्के असला पाहिजे. त्यामुळे ग्राहकांना ते सहज वाचता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं आहे.

साखर आणि फॅटवर मर्यादा

कोर्टाने लेबलिंगही बदलून टाकलं आहे. आता FSSAI ला केवळ अॅडेड शुगर नाही, तर पॉकेटमधील एकूण लाल साखर (टोटल साखर), सॅच्युरेटेड फॅट आणि मिठाच्या आधारे हा वैधानिक इशारा द्यावा लागणार आहे. त्यासाठी सीमा नव्याने ठरवावी लागणार आहे. DGI 2024 चा टेबल 15.1 जसाश तसा लागू करता येणार नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. यापूर्वी कोर्टाने FSSAI च्या एका प्रस्तावावरही सवाल केले होते. कंपन्यांना आपल्या मर्जीने नियम करण्यासाठी 365 दिवसाचा वेळ देण्याचा आणि नव्याने सल्लामसलत करण्याची मुभा या प्रस्तावात देण्यात आली होती. त्यावरही कोर्टाने सवाल केला आहे.

FSSAI ला मिळाली 4 महिन्याची डेडलाईन

सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश बंधनकारक आहे. कोर्टाने FSSAIला ड्राफ्ट नियम तयार करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी दिला आहे. नियम बनवण्यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, असे कडक आदेशच कोर्टाने दिले आहेत. एवढंच नाही तर FSSAIला पुढच्या 10 दिवसात आपली प्रोग्रेस रिपोर्ट कोर्टात सादर करायची आहे. त्यामुळे या विषयावर किती काम झालं हे समजणार आहे.

विद्यार्थ्यांचं शिक्षण

केवळ पॉकेटावर इशारा देऊन चालणार नाही. तर मुलांना जागरूक करण्यावरही कोर्टाने जोर दिला आहे. आदेशानुसार, आता देशातील शाळांमध्ये न्यूट्रिशनल लिटरेसी म्हणजे पोषणाशी संबंधित शिक्षण द्यावं लागणार आहे. त्यासााठी विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. खास वर्कशॉप आयोजित केलं जाणार आहे. लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यास भविष्यात ही मुलं जंकफूडपासून दूर राहतील, असं कोर्टाने म्हटलं आहेय.

Follow Us
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प
पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळे....
Pune : शुभम दादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला... पुणे कोर्टाबाहेरील हल्ल्यावेळी हल्लेखोरांची घोषणाबाजी; मंदार किवळेंच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sharad Pawar : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह
BMC : चार महिन्यांत पाचव्यांदा मुंबई महापालिकेला धमकीचा मेल; BMC मुख्यालयासह अनेक ठिकाणांना बॉम्बने उडवण्याचा इशारा
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे..
मुंबईतील 235 धोकादायक पागडी इमारतींचा प्रश्न ऐरणीवर; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये....
Mumbai : MNS : दुकानाच्या पाटीवर बॉम्बेचा उल्लेख, मनसेचा आक्षेप; फोर्टमध्ये कार्यकर्त्यांनी थेट लावले मुंबईचे पोस्टर
NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत....
Sanjay Raut on Supriya Sule : NDA मध्ये जाऊन सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत असतील, तर स्वागत, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान....
Devendra Fadnavis : 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, मुंबई कधीही...
पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल
Sushma Andhare : बलात्कार, अपहरण, खून... पुण्यातील गुन्ह्यांचा पाढाच वाचला; सुषमा अंधारेंचा पोलिसांना थेट सवाल