हिट चित्रपटात दिले प्रचंड बोल्ड सीन, एका रात्रीत बनली स्टार, आज इंडस्ट्रीपासून दूर आहे ही अभिनेत्री

या अभिनेत्री हिट चित्रपटामध्ये दिले इतक्या बोल्ड सीन की एका रात्रीत बनली स्टार. थिएटरमध्ये सीन पाहून चाहते झाले होते थक्क, मिस इंडिया आहे ही अभिनेत्री.

| Updated on: Mar 19, 2026 | 12:57 PM
1 / 6
तनुश्री दत्ता हिचा प्रवास केवळ चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित न राहता रहस्यमय आणि आध्यात्मिक अनुभवांनीही भरलेला आहे. जमशेदपूर येथे जन्मलेल्या तनुश्रीने 2004 साली Femina Miss India Universe 2004 हा किताब जिंकला, ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवली.

तनुश्री दत्ता हिचा प्रवास केवळ चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित न राहता रहस्यमय आणि आध्यात्मिक अनुभवांनीही भरलेला आहे. जमशेदपूर येथे जन्मलेल्या तनुश्रीने 2004 साली Femina Miss India Universe 2004 हा किताब जिंकला, ज्यामुळे राष्ट्रीय पातळीवर खळबळ उडवली.

2 / 6

2005 साली तिने 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत तिने काम केले. चित्रपटातील गाणी आणि तिच्या बोल्ड अभिनयामुळे ती रातोरात स्टार बनली.

3 / 6

मात्र, तनुश्री दत्ता केवळ अभिनयामुळेच नाही तर वादांमुळेही चर्चेत राहिली. तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत बॉलिवूडमधील गैरप्रकारांबद्दल उघडपणे भाष्य केले होते, ज्यामुळे इंडस्ट्रीत मोठी चर्चा रंगली होती.

4 / 6

याशिवाय तिच्या आयुष्यातील एक वेगळाच आणि रहस्यमय पैलू समोर आला आहे. एका जुन्या मुलाखतीत तनुश्रीने सांगितले होते की, लहानपणापासूनच तिला आत्मा आणि अदृश्य शक्तींचा अनुभव येत होता. तिच्या म्हणण्यानुसार, तिला लहान वयातच अशा गोष्टी दिसत आणि ती त्यांच्याशी संवादही साधत असे.

5 / 6

शालेय जीवनातही तिला अशा प्रकारचे अनुभव आले. करिअरच्या शिखरावर असतानाच तनुश्रीने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

6 / 6

अभिनयापेक्षा तिने आध्यात्मिक मार्ग स्वीकारत साधना करण्यावर भर दिला. त्यामुळे तिचा प्रवास हा ग्लॅमर आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us