
तान्या मित्तल हे नाव आता अनेकांच्या परिचयाचं झालं आहे. 'बिग बॉस 19'मध्ये तब्बल 800 साड्या घेऊन पोहोचलेली ही तान्या ग्रँड फिनालेपर्यंत टिकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. परंतु आता तान्याने टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.

माझे 150 बॉडीगार्ड्स आहेत, माझं घर पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही, कधी गोड खावंसं वाटलं तर मी थेट दुबईला जाते.. अशा अनेक बढाया तान्याने बिग बॉसच्या घरात मारल्या आहेत. तान्या आणि श्रीमंतीचा दिखावा हे बिग बॉसच्या घरात जणू एक समीकरणच बनलं आहे.

तान्याचे इन्स्टाग्रामवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि युट्यूबवरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. परंतु या तान्याची कमाई आणि संपत्ती किती आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? काही रिपोर्ट्सनुसार तान्या दर महिन्याला जवळपास सहा लाख रुपये कमावते.

तान्याची ही कमाई जाहिराती, ब्रँड कोलॅबरेशन, इंडोर्समेंट्स आणि फॅशन बिझनेसमधून होते. तर तान्याची एकूण संपत्ती जवळपास दोन कोटी रुपये इतकी आहे. तिच्यासाठी आलिशान गाड्या आणि मोठमोठ्या ब्रँड्सच्या अत्यंत महागड्या साड्या आहेत.

वयाच्या 19 व्या वर्षी तान्याने तिचा 'हँडमेड लव्ह बाय तान्या' हा ब्रँड लाँच केला होता. या ब्रँडअंतर्गत ती हँडबॅग्स, साड्या आणि इतर लाइफस्टाइल अॅक्सेसरीज विकते. 2018 मध्ये तान्याने 'मिस एशिया टूरिझम'चा किताब पटकावला होता.