Tata समूहाची कंपनी देणार पहिल्यांदा बोनस शेअर, एका शेअरचा होणार फायदा, डिव्हिडंडचेही गिफ्ट

Tata Group Share Market: शेअर बाजारात सातत्याने चढउतार दिसत आहे. या आठवड्यात अवघे चार व्यापार सत्र झाले. आता टाटा समूहातील या कंपनीने बोनस शेअर जाहीर केला. इतकेच नाही तर कंपनी लाभांश पण देणार आहे.

| Updated on: May 02, 2026 | 4:48 PM
1 / 6
Tata Group Trent Company ने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याचे जाहीर केले. कंपनीने बोनस इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. याच महिन्यात ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. इतकेच नाही तर कंपनी गुंतवणूकदारांना डिव्हिडंडचे गिफ्ट देणार आहे.

2 / 6
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे, त्यानुसार, ट्रेन्ट लिमिटेड 2 शेअरवर 1 शेअर बोनस देणार आहे. बोनस इश्यूसाठी कंपनीने 29 मे ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. म्हणजे या दिवसापूर्वी ज्यांच्याकडे या कंपनीचे शेअर असतील. त्यांना बोनस शेअर मिळेल.

3 / 6
ट्रेंट कंपनी बोनस शेअरसह डिव्हिडंड देणार आहे. कंपनीने एका शेअरवर 6 रुपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. डिव्हिडंडसाठी रेकॉर्ड डेट 10 जून 2026 ही निश्चित केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अवघ्या काही दिवसात दोन आनंदवार्ता मिळाल्या आहेत. त्यांचा मोठा फायदा होणार आहे.

4 / 6
गुरुवारी बाजार बंद होतेवेळी ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्सचा भाव बीएसईवर 2 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 4144.30 रुपयांवर ट्रेड करत होता. एका महिन्याचा विचार केला असता या कंपनीच्या शेअरमध्ये 25 टक्क्यांची तेजी आली आहे. या शेअरलाही बाजारातील चढउताराचा फटका बसल्याचे दिसते.

5 / 6
एका वर्षात हा शेअर 19 टक्क्यांनी घसरला आहे. बीएसईवर ट्रेंट लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकावर 6259 रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचा 52 आठवड्यातील निच्चांकी स्तर 3276.10 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1.47 लाख कोटी रुपये आहे.

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us