शिक्षिका पडली आपल्याच विद्यार्थ्याच्या प्रेमात, फूस लावून थेट पळवून नेलं, रुपाली टिचरची एकच चर्चा

समोर आलेल्या माहितीनुसार शिक्षिका ज्या विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली तो विद्यार्थी अल्पवयीन असून तो इयत्ता 11 वी मध्ये शिकतो. संबंधित विद्यार्थ्याचे वय 15 वर्षे आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 12:30 PM
1 / 5
शिक्षक-शिक्षिका हे विद्यार्थ्याचे जीवन घडवतात. विद्यार्थ्याला योग्य शिकवण देतात. परंतु सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. अभ्यासाचे धडे देणारी शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यालाच घेऊन पळून गेली आहे. या घटनेची सगळीकडे एकच चर्चा आहे.

शिक्षक-शिक्षिका हे विद्यार्थ्याचे जीवन घडवतात. विद्यार्थ्याला योग्य शिकवण देतात. परंतु सध्या एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय. अभ्यासाचे धडे देणारी शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यालाच घेऊन पळून गेली आहे. या घटनेची सगळीकडे एकच चर्चा आहे.

2 / 5

समोर आलेल्या माहितीनुसार शिक्षिका ज्या विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली तो विद्यार्थी अल्पवयीन असून तो इयत्ता 11 वी मध्ये शिकतो. संबंधित विद्यार्थ्याचे वय 15 वर्षे आहे. मुलगा अचानक गायब झाल्याने त्याला शिक्षिकेने पळवून नेल्याचे बोलले समोर आले.

3 / 5

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तर शिक्षिकेविरोधात अपहरण, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. सध्या रुपाली शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थिनी दोघेही फरार आहेत.

4 / 5

ही घटना उत्तर प्रदेशातील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विद्यालयातील आहे. आरोपी शिक्षिकेचे नाव रुपाली असे आहे. ती गेल्या एका वर्षापासून संबंधित शाळेत शिकवत होती. याच शाळेतील 11 विच्या विद्यार्थ्याला तिने जाळ्यात फसवलं.

5 / 5

विशेष म्हणजे शिक्षिकेने ज्या विद्यार्थ्याला फूस लावली तो शाळेच्या संचालकांचा मुलगा आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपी रुपालीचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे आम्हाला आमचा मुलगा परत हवा आहे, अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांकडून केली जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us