
टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना आपली आयुष्यभराची जोडीदार केलं आहे. यामध्ये विराट कोहली, हरभजन सिंह या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे.

टीम इंडियाचे खेळाडू आणि बॉलिवुड अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. पण यामधील काहींचीच लव्ह स्टोरी लग्नापर्यंत गेली.

टीम इंडियाचा असा एक खेळाडू आहे. ज्याची पत्नी अभिनेत्री नाही पण ती खूप प्रसिद्ध आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या खेळाडूपेक्षाही तिची अधिक चर्चा असते.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून स्टुअर्ड बिन्नी आहे. स्टुअर्डची पत्नीचे नाव मयंची लँगर आहे. मयंती ही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. मयंती लँगरने 2007 मध्ये करिअरला सुरुवात केली. वेगाने प्रगती केली आणि ती भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट अँकरपैकी एक बनली. मयंतीने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), आयसीसी वन -डे आणि टी-२० वर्ल्ड कप मध्ये काम केलं आहे.

मयंती लँगर आणि स्टुअर्ट बिन्नी इंडियन क्रिकेट लीग (ICL) स्पर्धेदरम्यान भेटले होते. भेटीनंतर दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 2012 मध्ये लग्न केले. सप्टेंबर 2020 मध्ये दोघांनी बाळाला जन्म दिला. . स्टुअर्ट बिन्नी हा बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे.