
आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. हा खास क्षण असून देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात उत्साहाच वातावरण आहे. देशात प्रत्येक ठिकाणी तिरंगा झेंडा फडकताना दिसतोय. भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य सुद्धा स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतायत. चाहत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (BCCI/Twitter)

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्माने हातात तिरंगा झेंडा धरल्याचा फोटो शेयर केलाय. (Rohit sharma Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या सोहळ्यात सहभागी झाला आहे. विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा सोबत तिरंगा झेंडा फडकवला. (Anushka Sharma instagram)

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने सुद्धा चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रवींद्र जाडेजाने पत्नी रिवाबा सोबत फोटो शेयर केलाय. (Ravindra jadeja instagram)

स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने सुद्धा इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेयर केलाय. हार्दिक पंड्या ट्रेडिशनल लूक मध्ये दिसला. त्याने हाती तिरंगा ध्वज धरला होता. (Hardik pandya Instagram)

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंशिवाय त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा आजादी का अमृत महोत्सव साजरा केला. स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सुद्धा ट्रेडिशनल लुक मध्ये दिसली. तिने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Dhanshree Verma instagram)

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सुद्धा आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला. (Sachin Tendulkar Instagram)