
टी- 20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियासोबत पंतप्रधान मोदींनी गप्पा मारल्या आणि स्टाफसह सर्वांसोबत फोटो काढले. याआधी नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं होतं.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आलं. नरेंद्र मोदी यांना बुमराह आपल्या कुटूंबासह भेटला.

बुमराहचा मुलगा अंगद याला नरेंद्र मोदी यांनी उलचून घेतलं. मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बुमराहने त्यानंतर आपल्या परिवाराचा फोटो शेअर केला.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आमंत्रण मिळालं होतं. माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या पाहुणचारासाठी मोदी सरांचे खूप खूप आभार, अस जसप्रीत बुमराहने ट्विट केलं आहे.

टीम इंडियाने नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाष्ट केला, गप्पा मारल्या आणि फोटो सेशन केलं. त्यानंतर टीम इंंडिया मुंबईला रवाना झाली.