Tejashri Pradhan: भर थंडीत त्यानं कडकडून मिठी मारताच… मनालीत तेजश्री प्रधानसोबत काय घडलेलं?

Tejashri Pradhan News: अभिनेत्री तेजश्री प्रधानने मनालीमध्ये एका मालिकेसाठी रोमँटीक सीन शूट केले होते. त्यावेळी तिची जी अवस्था झाली होती ती सहकलाकाराने बोलून दाखवली आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 10:03 AM
1 / 5
अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहज अभिनयाने चाहत्यांच्या मानत एक वेगळेच स्थान निर्माण केले  आहे. ती सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतेय. आता तेजश्रीबद्दलचा एक किस्सा तिच्या सहकलाकाराने बोलून दाखवला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहज अभिनयाने चाहत्यांच्या मानत एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ती सध्या झी मराठीवरील वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत काम करतेय. आता तेजश्रीबद्दलचा एक किस्सा तिच्या सहकलाकाराने बोलून दाखवला आहे.

2 / 5

तेजश्रीने लेक लाडकी या मालिकेतही काम केले आहे. या मालिकेच्या शूटिंगच्या वेळीचा एक किस्सा तिचा सहकलाकार असलेला आशुतोष कुलकर्णीने बोलून दाखवला आहे. या मालिकेतील विशिष्ट एपिसोडचे शूटिंग मनालीमध्ये झाले होते तेव्हा तेजश्रीची जी अवस्था झाली होती तो किस्सा आता आशुतोषने बोलून दाखवला आहे.

3 / 5

महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनशी बोलताना तो म्हणाला की, आम्हाला मनालीला शूटिंगला घेऊन गेले. आमचा एक सीन आहे, जो नंतर ब्रेक कार्ज ज्याला म्हणतात मालिका ज्याच्यावर असते. तर तसा सीन शूट करायला तेजश्री एका ठिकाणी उभी राहिली. मागे सगळा बर्फ होता."

4 / 5

तिला शिफॉनची साडी घालायला दिली होती, पदर वगैरे उडत होता, मी तिला जस्ट मागून येऊन तिला हग केलंय, आणि ती अशी लीन होते असा तो सीन होता, तो सीन अजून युट्यूबवर आहे." असे त्यानं बोलून दाखवलं आहे.

5 / 5

तिला आधीच थंडी वाजत होती, तेवढ्यात मला ॲक्शन मिळाली मा जस्ट जाऊन हग केला, मी जॅकेट घातलेले त्यामुळे तिला हग केल्याने तिला उबदार वाटलं, लोकांना तो सीन पाहून वाटेल आम्ही काहीतरी रोमँटिक बोलतोय पण नाही ती माझ्या कानात म्हणाली बरं झालं तू आलास, तुझ्या या जॅकेटने मला वॉर्म मिळते. बरं वाटतंय मला असंच राहा तू थोडा वेळ अजून."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us