
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी ती लग्न करणार आहे. तेजस्विनीच्या हातावर समाधान यांच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनीने ऑक्टोबर महिन्यात समाधान यांच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

मेहंदीच्या कार्यक्रमात तेजस्विनीचा अत्यंत साधा आणि तितकाच आकर्षक लूक पहायला मिळाला. तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या हात आणि पायांवर सुरेख मेहंदी काढण्यात आली आहे.

केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांच्या 'नो प्रॉब्लेम' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा नुकतीच तिची दहावी झाली होती. पहिल्याच चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशीच्या हिरोइनची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच तेजस्विनी निर्मातीसुद्धा आहे.

समाधान सरवणकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत. तेजस्विनी आणि समाधान त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत.