
अमेरिकेच्या प्रसिद्ध अशा हार्वर्ड कॅनेडी स्कुलमध्ये एक लीडरशीप प्रोगाम आहे. यामध्ये भारतातील तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी सहभागी होणार आहेत. या लीडरशीप प्रोग्राममध्ये जगभरातील प्रतिष्ठित नेते सहभागी होणार असून आधुनिक काळात नेतृत्त्व करताना येणाऱ्या अडचणी आणि संकटांवर चर्चा होणार आहे.

या लीडरशीप प्रोग्रामचे नाव ‘Leadership for the 21st Century’ असे आहे. 25 जानेवारी ते 30 जानेवारी या काळात अमेरिकेतील केम्ब्रिज येथे या पाच दिवशीय डीरशीप प्रोग्रामचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त देशातील वरिष्ठ नेते सहभागी होतील.

या अभ्यासक्रमात वास्तविक जीवनात लोकांशी संबंधित असणाऱ्या उदाहरणांचा संदर्भ देऊन नेता कसा असावा याबाबत सांगितले जाते. या अभ्यासक्रमात राजकारण, प्रशासन आणि समाज या घटकांवर चर्चा केली जाते. वेगवेगळ्या देशातील अनुभव या प्रोग्राममध्ये शेअर केले जातात.

या अभ्यासक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला सर्व लेक्चर्स करावे लागतात. नेतेमंडळींना स्वाध्याय आणि गृहपाठही दिला जातो. कोणत्याही एका ग्रुप प्रोजेक्टवर त्यांना काम करावे लागते. या अभ्यासक्रमात सहभागी झालेले नेते रोज सकाळी सुरुवातीला आपापले अनुभव शेअर करतात. त्यानंतर समस्यां आणि या समस्यांचे स्वरुप समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाची फी 12900 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 10 ते 11 लाख भारतीय रुपये आहे. या फीमध्ये ट्यूशन फी, हार्वर्ड कॅम्पसमध्ये राहण्याची सुविधा, जेवणाची व्यवस्था केली जाते. या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या नेत्यांना त्यांच्यापुढील समस्या सांगाव्याल लागतात. या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो.