
ठाण्यातील कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे भरदिवसा 20 वर्षीय तरुणाने पती, पत्नीसह त्यांच्या मुलावर केला धारदार कात्रीने हल्ला केला आहे

या हल्ल्यात, गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला आहे. तर या हल्ल्यात मुलगादेखील गंभीर जखमी आहे. या हल्ल्यात महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे.

चमनलाल कारला असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव कार्तिक असे आहे. या दोघांवर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

चिराग सोनी असे या हल्लेखोर तरुणाचे नाव असून बाजारपेठ पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. चमनलाल कारला आणि चिराग सोनी हे दोघे एपीएमसी मार्केटमध्ये आजूबाजूला केळीची पाने विक्री करण्याचा करायचे.

आज विक्रीसाठी आलेले केळीच्या पानांचे बंडल अदलाबदली झाल्याने चमनलाल आणि यांच्यात वाद झाला होता.

याच वादातून चिरागने चमनलाल कारला यांच्यावर कैचीने हल्ला केला होता. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास चालू केला आहे.