
अंबरनाथ, बदलापूर शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीला मोठा पूर आला आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे.

सध्या मुंबईच्या दिशेने एकही लोकल सुटत नसल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

पावसामुळे कल्याणमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पावसामुळे प्राचीन शिवमंदिरात जाणाऱ्या पुलाचे रेलिंग्ज तुटून वाहू गेले आहेत.